Ad will apear here
Next
अवलोकन यजुर्वेद दर्शन
‘वेदांचे ज्ञान हे केवळ शब्दज्ञान नव्हे, तर त्यात आनंद अंतर्भूत झालेला आहे..... हेच ज्ञान माणसाला समाजात राहूनही आत्मतत्वापर्यंत घेऊन जाते’, असे डॉ. वर्षा देवकर यांनी या पुस्तकाच्या संपादकीयात म्हटले आहे.

आत्मतत्वापर्यंतच्या प्रवासाची दिशा या पुस्तकातील विविध लेखांमधून मिळते. आयुर्वेदाचे दोन मार्ग आहेत. त्यापैकी एक म्हणजे वैशंपायन आचार्यांच्या परंपरेत कृष्णयजुर्वेदाचा अंतर्भाव होतो, तर याज्ञवल्क्य परंपरेत शुक्ल्यजुर्वेदाचा अंतर्भाव होतो.

पुस्तकात प्रारंभी डॉ. सुमती देशपांडे यांनी यजुर्वेदाचे अंतरंग उलगडले आहे. त्यानंतर शुक्ल्यजुर्वेद चिंतन, रुद्राध्याय, यज्ञ, शुक्ल व कृष्णयजुर्वेदाची उपनिषदे यांची स्वतंत्रपणे माहिती मिळते. डॉ. प्रज्ञा कुलकर्णी यांनी यजुर्वेदातील यज्ञांचा विकास व उदात्तीकरण याविषयी माहिती दिली आहे. डॉ. अंबरीष खरे यांनी निर्मिती व रचना यांची ओळख करून दिली आहे.

प्रकाशक : सुंदर संस्कार व स्वाध्याय मंडळ
पाने : २०८
किंमत : १५० रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)


 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/BZQIBN
Similar Posts
डेक्कन कॉलेजमध्ये ‘संशोधन पद्धती’वर अभ्यासक्रम पुणे : संशोधन करताना येणार्‍या अनेक अडचणी सोडवण्यासाठी पुण्यातील डेक्कन कॉलेज पोस्ट ग्रॅज्युएट अ‍ॅंड रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये संशोधन पद्धती (रिसर्च मेथडॉलॉजी) हा सहा महिन्यांचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम आयोजित करण्यात आला आहे. या वर्षीच्या अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.
कुंडलिनी शक्ती योग, कुंडलिनी व श्वासोच्छ्वास हा त्रिकोण म्हणजे शरीराची प्राणशक्ती आहे. मन एकाग्र केल्यानंतर कालांतराने समाधी अवस्था येते. श्वासोच्छ्वासाची गती मंदावते व त्यातून पुढे कुंडलिनी जागृती सुरू होते. हे त्वरेने शक्य नसले, तरी रोजची बैठक, ध्यान साधना यातून आपल्या शरीरातील कुंडलिनी जागृत करू शकतो.
श्रीमद् भगवद्गीता : श्रीकृष्ण बासरीचे सूर आप्तस्वकीयांविरोधात लढायचे या विचाराने भर रणांगणात अर्जुन गर्भगळीत होतो; पण ही लढाई फक्त कौरव-पांडव यांच्यातील नसून ती संपूर्ण समाज, धर्मासाठी कशी आवश्यक आहे, हे कृष्णाने त्याला छंदोबद्ध काव्यातून सांगितले. ते काव्य म्हणजे गीता, असे वर्णन करून वासुदेव वामन बापट गुरुजी यांनी ‘श्श्रीमद् भगवद्गीता : श्रीकृष्ण
सोळा संस्कार- का आणि कसे + व्रतवैकल्ये कोणी- कोणती-का करावी? जीवन समृद्ध होण्यासाठी मनावर आणि बुद्धीवर संस्कार होणे आवश्यक असते. आर्य वैदिक धर्मात त्यासाठी १६ संस्कार कोणते, त्यांचे स्वरूप काय, त्याचा हेतू काय याची माहिती वेदमूर्ती श्रीकांत चितळे गुरुजी यांनी या पुस्तकात दिली आहे. जन्मापासून ते मृत्यूपर्यंतचे हे संस्कार आहेत. ते विधीपूर्वक केले जातात. श्रवण सुरू झाला की व्रतवैकल्ये सुरू होतात

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language